Friday, August 22, 2008

Mard Maratha


अजूनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,कुणाचीही हिम्मत नाही "मराठ्याना" संपवण्याची,घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,आणी मराठ्याशिवाय पर्याय नाहि महाराष्ट्राच्या मातीला !!!!

माझं कोल्हापूर


खळाळत्या जीवनाचा निर्झर कोल्हापूर...

मनातल्या माणूसकीचा पाझर कोल्हापूर...

रंकाळ्याचा वारा कोल्हापूर..

.पन्हाळ्याच्या धारा कोल्हापूर...

खासबागेतील कुस्ती कोल्हापूर...

जेवल्यानंतरची सुस्ती कोल्हापूर...

चपलेपासून फेट्यापर्यंत मातीचा सुगंध कोल्हापूर...

मनानं, शरीरानं, आत्म्यानं बेधुंद कोल्हापूर...

मिसळीचं वाटण कोल्हापूर...

पांढ~या रश्श्यातलं मटण कोल्हापूर...

शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर...राजकारणातली गेम कोल्हापूर...

शाहीरीचा बाज कोल्हापूर...

गळ्यातला साज कोल्हापूर...

मातीमधलं घोंगडं कोल्हापूर...

नखशिखांत रांगडं कोल्हापूर...

ताराबाई पार्कातलं चुणचुणीत कोल्हापूर...

शिवाजी पेठेतलं झणझणीत कोल्हापूर...

क्षणोक्षणीजिथेतिथे...भरपूरपुरेपुरे...ते.......

माझं कोल्हापूर